३० सप्टेंबर २०१०

मेन इन ब्लीड ब्ल्यू

विश्वचषक ११ साठी भारतीय क्रिकेट संघ आता "मेन इन ब्ल्यू" मध्ये नाही तर "मेन इन ब्लीड ब्ल्यू" मध्ये दिसेल.
काल चंडीगड येथे खेळाडूंच्या पोषाखाचे प्रायोजक असलेल्या "नायके"ने Worldcup11 साठी नवी जर्सी सादर केली आहे.
या पोषाखाचे अनावरणही नेहमी सारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये न होता, चंडीगडच्या खुल्या मैदानात झाले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरु, भज्जी,गौतम गंभिर, झहिर खान व प्रग्यान ओझा यांनी या जर्सीसह रॅम्प केले. आरामदेह असणाऱ्‍या या जर्सीसाठी निळ्या रंगाची ब्लीड ब्ल्यू ही नवी छटा वापरण्यात आली आहे.